'खूप सारे' हा शब्दसमुच्चय मला (हिंदीप्रमाणे) पुष्कळ ह्या अर्थी वापरू नये असे मला मनोमन वाटते.

दिसतात खूप सारे श्रीराम आणि बाजी
येथे खूप सारे असा शब्दसमुच्चय न घेता
 
सारे ... श्रीराम आणि बाजी खूप दिसतात
म्हणजे
( आपण श्रीराम आणि बाजी  आहो असे स्वतःला समजणारे) सगळे लोक श्रीराम आणि बाजी (प्रमाणे) खूप दिसतात. म्हणजे त्यांच्या दिसण्यात (श्रीराम वा बाजीशी) साम्य 'खूप' असते

असा अर्थ घ्यावा असे सुचवावेसे वाटते.

दुसरा पर्याय म्हणजे खूप आणि सारे असा संदिग्ध प्रयोग करण्या ऐवजी
दिसतात खूप येथे श्रीराम आणि बाजी
असा बदल सुचवावासा वाटतो.

अर्थात अधिकार कवीचा आहे.