उदाहरणे आवडली. पण...
सासूसी असा जुन्या काव्यातला अशुद्ध शब्द. सासूशीं ऐवजी वापरलेला.
अधोरेखित शब्द निश्चितपणे 'अशुद्ध' म्हणता येईल काय? शुद्धलेखनाच्या तत्कालीन प्रचलित (असल्यास) नियमांप्रमाणे हे रूप शुद्ध नसू शकेल काय?
'अमूकतमूक यांसी' हे रूप जर शुद्ध ठरू शकते, तर 'सासूसी' का ठरू नये? या कारणास्तव, ते 'अशुद्ध'ऐवजी 'नंतर वापराबाहेर गेलेले' असे म्हणता येणार नाही काय?
मुळात 'शी' हा तृतीयेचा प्रत्यय हे 'सी' या (तृतीयेच्याच) प्रत्ययाचे अपभ्रष्ट (आणि नंतर प्रचलित झालेले) किंवा समांतर वापरातले (परंतु कदाचित अशिष्टसंमत*) रूप असू शकेल काय?
*'अशिष्टसंमत' हा शब्द खरे तर 'शिष्ट-असंमत' (शिष्टासंमत) असा लिहिला जावयास नको काय?
कृपया शंकासमाधान व्हावे.