लोक आपल्या लाडक्या कलावंताला उपाधी देतातच. काही उपाध्या सवंग वाटल्यास त्या आक्षेपार्ह वाटू शकतात. "सम्राट" किंवा "सम्राज्ञी" अश्या उपाध्या सवंग वाटण्याची शक्यता असते. सावरकरांना "हिंदुहृदयसम्राट" म्हणत, पुढे बाळासाहेब ठाकऱ्यांना तीच पदवी लावल्यावर त्यात सवंगपणा आला. दूरदर्शनवर "हास्यसम्राट" वगैरे कार्यक्रम चालू असतात. खरे तर सुलोचना चव्हाण यांना लोक "लावणी सम्राज्ञी" म्हणतात तेही मला थोडेसे सवंगच वाटते.
यापेक्षा चांगल्या म्हणजे सवंग न वाटणाऱ्या उपाध्या दिल्या तर कोणाला आक्षेप राहणार नाही. उदा. "गानसरस्वती" किशोरी आमोणकर, "गानकोकिळा" लता मंगेशकर
दुसरे म्हणजे "गझलसम्राट"ही पदवी थोडीशी विचित्र/विसंगत वाटते. सावरकरांना "हिंदुहृदयबादशहा" अशी पदवी दिली असती तर कसे वाटले असते? "हिंदुहृदय" आणि "बादशहा"हे शब्द एकमेकांशी मिळते जुळते नाहीत. त्याचप्रमाणे "गझल" आणि "सम्राट" हेही. "हिंदुहृदय" बरोबर "सम्राट" हेच योग्य आहे तर गझलेबरोबर "बादशहा", "शहेनशहा" असे शब्द योग्य ठरले असते. लता मंगेशकरला "मल्लिकाए तरन्नुम" कोणी म्हणत नाही तसेच नूरजहांला गानकोकिळाही.
विनायक