आपण ज्या हेतूने या ग्रंथांची ओळख करून देत आहात्, तो हेतू स्तुत्य आहे. मला नेहमी वाटते की, आपल्या पूर्वजांनी जे निर्मिले आणि कालौघात आपल्यापासून दुरावले गेले, ते ज्ञान अत्यल्प किंमतीत सर्वसामान्य मुलांनाही उपलब्ध व्हावयास हवे. (आपल्यातीलच) कुणी उठावे आणि हिणवावे अशी परिस्थिती भारतीय संस्कृतीबाबत नक्कीच नाही. लतापुष्पाजींशी मीही सहमत आहे. आमच्याकडे बुद्धिमत्तेचा दुष्काळ नाही. आत्मसंतुष्टता (तसेच अल्पसंतुष्टता) हा दोष मात्र जरूर दिसतो.