चला या निमीत्तानी तुम्हाला मी माझी वैयक्तीक भूमिका सांगतो. तुम्ही कुणीही जर माझ्या वैयक्तीक जीवनात बघीतलं तर मी सगळ्यांच्या मनात जी स्वच्छंद जगावं अशी इच्छा असते तसा (व्यवस्थित संसार करून, उत्तम व्यवसाय करत, बाय द वे, मी सी. ए. आहे) जगतो, मी झोपण्यापूर्वी माझं सर्व काम संपलेलं असतं. मला खरोखरी सत्य गवसलं असल्यामुळे आणि मी ते सारखं उपयोगात आणत असल्यामुळे मी कधीही काहीही लेफ्ट ओव्हर ठेवत नाही त्यामुळे मला भविष्यकाळ असा काही राहत नाही. माझं सर्व काम इतकं संपलेलं असतं की मला वार कुठला, तारीख किती किंवा वाजले किती याची काहीही पर्वा नसते. मी घड्याळ वापरत नाही, मला सेल फोनची गरज नाही, टि व्ही बघत नाही, पेपर वाचत नाही आणि कोणतीही साधना करत नाही त्यामुळे मी कायम मुक्त असतो. मला उत्तम टेबल-टेनीस, पोहणं, गाणी वाजवणं आणि योग व प्राणायाम अवगत आहे आणि हे सगळं मी रोज करतो त्यामुळे माझा दिवस फार भन्नाट जातो. माझ्या अवती भवतीचे सगळे माझ्या विषयी कुतुहलात असतात. तर या बॅकग्राउंडवर मला असं वाटतं की सर्वांना असं रहायला जमलं तर मला कंपनी तरी होईल हा माझ्या लेखनाचा एक हेतू आहे.
मी जगात उपलब्ध असलेल्या सगळ्या अध्यात्मिक प्रणाली (गीता, कुराण, उपनिषदं, बायबल, झेन, ताओ, भक्तीमार्ग, तंत्रसूत्र, बुद्ध, महावीर, सूफीझम, आज मितीला उपलब्ध असणाऱ्या सर्व ध्यान प्रक्रिया) पूर्ण अभ्यासल्यामुळे माझ्या विचारात आणि आकलानात कमालीची क्लॅरिटी आली आहे. मला अखंड आनंदावस्था किंवा कुंडलिनी अथवा तत्सम गोष्टींमध्ये अजीबात रस नाही. माझं सत्य फार सहज आणि सोपं आणि रोजच्या जगण्याला उपयोगी असं आहे. अशा परिस्थितीत मी कुणाला आणि कशासाठीही दुखवण्याचा प्रश्न येत नाही.
आता मनोगत सारखं संकेतस्थळावर लिहीणं हा माझा आनंद आहे कारण माझे नातेवाईक आणि मित्र मी काय म्हणतो ते ऐकायला उत्सुक असतात. मला माझ्या लेखांवर होणाऱ्या चर्चा, उलट सुलट प्रतिक्रिया यातून लोकांचा विचार करण्याचा दृष्टीकोन समजतो (माझ्या २२ व्या लेखावरचा सौरभचा प्रतिसाद बघा). लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे माझ्या सत्याच्या आकलनात काही फरक पडत नाही किंवा स्वच्छंद जगण्यात काही अंतर पडत नाही.
मी हा विषय चर्चेला ठेवायचं कारण 'कलावंताना पदवी द्यावी का नाही' या विषयावर (आपण पदवी देणारे किंवा आपल्याला पदवी मिळणार नसताना) इतके प्रतिसाद कसे हे बघायला गेलो तर वैयक्तीक प्रश्नोत्तरं चालली होती. आता एकतर या विषयावर चर्चेचं प्रयोजनच मला कळेना तेव्हा मला असं वाटलं की आपण सगळे 'आनंद किंवा माहिती' याच हेतूनी इथे सगळं लिहीलं तर ते निर्वैयक्तीक होईल आणि सर्वांना उपयोगी होईल म्हणून मी हा प्रस्ताव ठेवलाय.
संजय