संजयजी, अगदी मनातलं आपण मांडलंत्. धन्यवाद.
       आनंदाचे परिमाण आनंद जरी असले तरी उपभोगाचे मार्ग भिन्न असणं स्वाभाविकच असतं. त्यामुळे हलकासा उपहास, किंचित् भांडणं, मतभेद, रुसवे हेही एखाद्याच्या दृष्टीने आनंद उपभोगण्याची साधन असू शकते. विडंबन, अतिशयोक्ती  हा त्यातलाच एक प्रकार म्हणता येईल. अशा वेळी वाचकांनीही प्रतिसाद देताना त्या पातळीवर जाणे हे तितकेच आनंददायी ठरणारे असते. मनोगत  मला प्रिय असणारे जाल आहे, ते तेव्हढ्याच साठी. टारगटपणाचाही वीट येतो, त्याबाबतीत मनोगत सुखावह वाटते. आपण जे सुरुवातीलाच म्हटले आहे, 'मनोगत हे बहुदा आपापल्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या आणि सर्व दूर पसरलेल्या मराठी लोकांचे संकेतस्थळ आहे' ते खरेच आहे आणि हेही तितकेच खरे की प्रशासकांची रुची ही तितक्याच उच्च पातळीची आहे. त्यामुळेच मनोगतला एक उंची प्राप्त झाली आहे. प्रशासकांचे जेव्हढे आभार मानावेत, तितके कमीच आहेत.