उंबरा होता मुका अन बंद होते दार ही
साद कोणाचीच नाही, पावले अडतात का?

घातले आहेस कुंपण तू मनाच्या भोवती
नाग माझ्या आठवांचे एवढे डसतात का?

हासले कोणी जरासे, चालले दो पावले
ह्या क्षणांच्या सोबतीने माणसे कळतात का?

वाव्वा.. छान. साध्य आणि सहज. वरील तिन्ही द्विपदी आवडल्या. ह्या क्षणांच्या ऐवजी दो क्षणांच्या वाचले.

राहू दे, उरलो जरासा, मी तुझ्या हृ्दयांत ग
ग ऐवजी गे हवे होते का? गे, ग टाळताही येईल म्हणा. हृदयामधे/मध्ये केल्यास.

बाकी तुम्ही छानच लिहिता.