माझी बडबड येथे हे वाचायला मिळाले:
पुस्तक हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आजवर शेकडो पुस्तकं वाचली. प्रत्येक पुस्तकाने मला काही ना काही दिले. विशिष्ट तत्त्वज्ञान, अनुभवांतून येणारं शहाणपण, विरंगुळा किंवा कधीकधी तर दिवसेंदिवस वेढून राहणारी पुस्तकाची धुंदी. असं एखादं पुस्तक हाती आलं की मग लेखकाला हा विचार नेमका कसा सुचला असेल याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतं. उदाहरण द्यायचं झालं, तर शेरलॉक होम्सच्या कथा वाचताना , डॉयल्लला मुळात इतकं भन्नाट काही सुचूच कसं शकतं असा विस्मय हटकून वाटतोच वाटतो. जे के रोलिंगला हॅरी पॉटरची कथा कशी सुचली याची कथा तर जगप्रसिद्धच ...