सुंदर गझल. आवडली.
उंबरा होता मुका अन बंद होते दार ही
साद कोणाचीच
नाही,पावले अडतात का?
घातले आहेस कुंपण तू मनाच्या भोवती
नाग
माझ्या आठवांचे एवढे डसतात का?
हासले कोणी जरासे, चालले दो पावले
ह्या क्षणांच्या
सोबतीने माणसे कळतात का?
आर्जवे केली तुझी मी, हात माझे जोडले
माणसांवर,
सांग म्रृत्यो, हे असे रुसतात का?
कोणत्या अतृप्त इच्छा राहिल्या मागे 'मिलन'?
पिंड
सजलेला तुझा हे कावळे बुजतात का?
- व्वा.