कवितांच्या धबधब्यात हा लेख कुठे वाहून गेला होता कळलेच नाही. सुरेख लेख.
एक मजेशीर प्रसंग आठवला.
काही दिवसांपूर्वी बेंगळूरात काही कामानिमित्त होतो. एके दिवशी बाणेरघट्टा रोडवर (नेहमीप्रमाणेच) भयंकर ट्राफिक जाम होते. त्या रस्त्यावर ओरॅकल कंपनीचे एक कार्यालय आहे. मी सवयीप्रमाणे चालत चालत विश्रामगृहाकडे परत येत असताना बाणेरघट्टा रस्त्यावरुन होसूर रोडकडे वळलो आणि पाच मिनिटे चालून पुढे आल्यावर एका बाईकवाल्याने ओरॅकल पीबीएस कुठे आहे असे विचारले. मला बेंगळूरातली अगदीच प्राथमिक माहिती असल्याने ओरॅकल नाव ऐकून, मी त्याला होसूर रोडवरुन डावीकडे वळण्याचा सल्ला दिला आणि पुढे बाणेरघट्टा रोडवर पाठवून त्याच्या तासाभराच्या ट्राफिकजाम मध्ये अडकण्याची निश्चिती केली.
बाईकवाला गेल्यानंतर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला ओरॅकल पीबीएस (प्रेस्टिज ब्लू चीप) सॉफ्टवेअर पार्क असा बोर्ड दिसला. :-)