चंद्रशेखर वेंकट रामन, श्रीनिवास रामानुजम इ. नीं संशोधन केलें तेव्हां भारत पारतंत्र्यातच होता. तेव्हां लतापुष्पा याचें म्हणणें ठीकच. बसूंनीं रेडिओच्या शोधाचें पेटंट घ्यायला लोकहितार्थ नकार दिला होता. इतर सामाजिक कारणां मुळें संशोधन झालें नाहीं. उदा. सामाजिक कारणांमुळें ज्ञानेश्वरांसारखा प्रज्ञावंत अध्यात्माकडे वळला, एका मराठी प्रज्ञावंतानें तर मेक्सिकोत संशोधन आणि जीवितकार्य केल्याची बातमी नुकतीच बहुधा मनोगतावरच वाचली होती.  टिळक गणिती होतेच.  

अजूनदेखील आयुका, आय आय एस सी, सारख्या संस्था वगळतां कोणत्याही विद्यापीठांत मूलभूत संशोधनासाठीं अनुकूल वातावरण नाहीं. आपल्या विशिष्ट गुणांकनयुक्त कोचिंग क्लासप्रधान शिक्षणपद्धतीत धनाढ्य विद्यार्थ्यांपुढें अनेक गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थी तुलनेनें कमी गुण मिळून निष्प्रभ होतात.

बाकी लेख छान.  एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद

सुधीर कांदळकर