तो झुणका. झाला असेच हवे.

घट्ट पिठल्याची गंमत आठवते...
आईने कढईत, तव्यावर असे पिठले केले आणि ते जरुरीपेक्षा जास्त काळ आंचेवर राहिले की मग त्याखाली पिठल्याचा जो खरपूस थर तयार व्हायचा, तो उचटण्याने (यालाच कुणी कुणी उलथणे असेही म्हणतात...) खरवडून खाण्यात अशी काही मजा यायची की बस.  असा खरपूस थर तयार व्हावा म्हणून तर कधी कधी मुद्दामच या पिठल्याला जास्त आंच दिली जाई...! बालपणी हा खाद्यपदार्थ खूपच खास वाटायचा...
आता मोठेपणीही तो तसाच खरवडून काढून खायला तितकीच मजा येऊ शकेल म्हणा.