काहीतरी... कधीतरी... उगीचच... येथे हे वाचायला मिळाले:

काल जेष्ठ कृष्ण सप्तमी. अवघ्या महाराष्ट्राची माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा ह्यांच्या पालखीचे आळंदीहुन पंढरपुरसाठी प्रस्थान झाले. त्याअगोदर दोन दिवस जगतगुरु तुकोबाराय ह्यांची पालखी देहुहुन निघाली. दोन्ही पालख्या आणि इतर संतांच्या पालख्या ह्या साधारण १८-२० दिवसांचा प्रवास करुन आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी ’आषाढी एकादशी’ साठी पंढरपुर येथे पोहचतील.

ह्यावर्षी पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी आळंदीत जाण्याचा योग आला. तसं आमचं घराणं माळकरी! आमचे मोठेबाबा हे दरवर्षी वारीला न चुकता जाणारे. आमचे पप्पा कधी पायी वारीला गेल्याचे मला आठवत नाही पण ते ...
पुढे वाचा. : पुंडलिक वरदे हरि कृष्ण