हे गुलाबजाम वगैरे विरघळले की त्यांच्यासाठी वापरायचा खास स्वयंपाकघरातील शब्द म्हणजे गुलाबजाम हसले! मला तर कध्धी कळायचे नाही, की कोणत्याही कोनातून मला कधीच कोणताच गुलाबजाम ''हसताना'' दिसलेला नाही!!!! मग हे गुलाबजाम कसे काय हसतात बुवा? एकदा आईपाशी हट्टही केला होता, मला हसणारे गुलाबजाम दे म्हणून!
मग बऱ्याच काळाने समजले की 'हसणारी' व्याख्या सांकेतिक आहे. त्याचा अर्थ गुलाबजाम बिघडले व विरघळले. ज्याने कोणी/ जिने कोणी ह्या व्याख्येचा शोध लावला तिला माझे __/\__