लाहनपणी शाळेत जाताना रबरी चपलांमुळे सट्याक - फट्याक करत चालताना पाठीवर चिखलाच्या पाण्याचे थेंब मागून पायावर, पाठीवर अगदी मानेपर्यंत उडायचे. आई पप्पा जाम रागवायचे. पायानं मित्रांच्या अंगावर पाणी उडवण्याच्या खेळाची मजा तर काय वर्णावी!! जाम मिस करतोय ती मजा पण यावेळी मॉन्सूनमध्ये महाराष्ट्रात आल्यावर हे सगळं करणार आहे.