नेमाड्यांची सर्व गद्यपुस्तके आवडली आहेत. त्यांच्या काहीच कविता वाचनात आल्या, त्यातल्या ज्या कळल्या त्या आवडल्या. मात्र हिंदूबाबत प्रकाशकांसोबतची टूर, मुलाखतींमागून मुलाखती, नेमाड्यांची स्वाक्षरी असलेल्या विशेष प्रती यानिमित्ताने नेमाडे यांचे वागणे व लिहिणे यात तफावत असल्याचे उघड झाले. किंवा त्यांचे मतपरिवर्तन झाले असावे असे वाटते.

शेवडे यांचा लेख वाचायला मिळाला असता तर बरे झाले असते. लोकमतच्या संकेतस्थळावर रत्नागिरी आवृत्ती असे कुठे लिहिलेले नाही.