रत्नाकर,
गझल आवडली, विशेषत: "तमाशा पाहणारे". मात्र 'लाभले' शब्दाचा वापर जरा खटकला. लाभणे ह्या क्रियापदास फायदा होण्याची, शुभ असण्याची अर्थच्छटा आहे. तुमचा हा वापर औपरोधिक असला तरी संपूर्ण गझलभर आल्याने त्याची धार बोथट झाली आहे. त्याऐवजी 'भेटले' किंवा 'पाहिले' हे पर्याय वापरता आले असते.