अत्ताच काही दिवसांपूर्वी आम्ही सोलापुरात हास्य रंग कॉमेडी नावाचा कविता वाचनाचा कार्यक्रम केला.... मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर, आणि प्रसाद कुलकर्णी असे कवी होते.... सोबत त्यांच्या कविता उलगडायला आणि मुलाखतीतून त्यांचे व्यक्तीमत्व उलगडायला भाऊ मराठे आणि माझा नवरा स्वप्नील रास्ते होते...

१००० क्षमतेच्या रंगमंदिरात १५०० लोक बसली होती... काही उभ्याने तर काही जमिनीवर बसून कार्यक्रमाचा, कवितांचा आस्वाद घेत होती...  एवढेच नव्हे तर रंगमंदिराच्या पटांगणात पडदा लावून कार्यक्रम दाखवला जात होता..... बाहेरही पेपर टाकून जवळ जवळ पाचएकशे लोक बसले होते....

पाडगावकर वयाच्या ८२ व्या वर्षीही ऑन द स्पॉट सुंदर चारोळ्या/ कविता करतात ह्याचा सुंदर अनुभव घेतला आम्ही... रात्री जेवताना तर ते कवितांच्या जगात आपल्या कल्पनेच्या लेखणीवर आरूढ होऊन आम्हाला वेगळीच सफर करवीत होते.... मी अनुभवलेला एक कविश्रेष्ठ ..... आयुष्यात कधीच मी ते क्षण विसरू शकत नाही....