अनुभव चांगला लिहिला आहे. गुप्तधनाचा किस्सा खासच.
अवांतर:
सावनेरला अनेक वर्षांपूर्वी राम गणेश गडकरी ह्यांचे स्मारक खास बघायला गेलो होतो. छोटेसे जुने कौलारू घर होते. फार बरे वाटले होते. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखानाही ह्या भागात आहे. दुसऱ्या कुठल्या मराठी साहित्यिकाच्या नावाने सहकारी साखर कारखाना आहे असे वाटत नाही.