"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

लालभडक ते नेत्र चमकती, हस्त स्फुरती धीर मना।

श्री दामोदर सिद्ध जाहला जायालागी खलशमना॥

कांता वदली, कांता जाता देशहिताला करावया।

पतिराया घ्या निरोप जावे त्वरित कीर्तीला वरावया॥

लहानपणी १३-१४व्या वर्षी कधीतरी वाचलेल्या ह्या सावरकरांच्या ओळी न जाणे कश्या माझ्या स्मृतिपटलावर अगदी कोरल्या गेल्यात. तेव्हा काय वाचत होतो, तेही आठवत नाही. पण अगदी कोवळ्या वयात(वयाच्या चौदाव्या वर्षी) सावरकरांनी दामोदर चाफेकरांवर रचलेल्या पोवाड्याच्या ह्या ओळी जश्याच्या तश्या तोंडपाठ आहेत. आजही कुठे लालभडक हा शब्द वाचला, की ह्याच ओळी ओठांवर ...
पुढे वाचा. : सावरकर आणि आपण