ज्याला माहित नाही, मात्र हे माहित आहे की सत्पुरूष विरळेच असतात. मूर्ख तसेही सदासुखी असतात. निद्रिस्ताला जागे करणे अवघड असते. त्यामुळे माहित करून घेण्याजोगे काहीच नाही आणि तसा प्रयत्न करणेच गाढवपणा आहे तेव्हा सवडीशास्त्र हाच परमधर्म मानून स्वच्छंद, तणावमुक्त रहाल तर सारे माहित असल्यातच जमा आहे असे सरळमार्ग्याला तेच ते आणि जोरजोरात सांगून सदासुख्यांची जमात वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करतो तो सर्वज्ञ.  

--- त्याचे चरणतीर्थ घ्या (आणि सदासुखीपणाचा वैताग आला की सत्पुरूषाचे अनुकरण करा).