जन्मल्यावर दोनतीन तासात
नर्सबाईने ओढून पुढ्यात
खरडले माझे नाव... कागदावर
मग झालो मी मोकळा
मुक्त काढायला गळा
झाले शिक्कामोर्तब माझ्या... असण्यावर

कविता मस्तच आहे.... पण ही सुरुवात खूप आवडली.