परागला मुलाविषयी काय वाटतं यावर सर्व अवलंबून आहे. सात वर्षात बायको आपणहून मुलाला घेऊन घरी (सासरी) आली नाही म्हणून परागनीही मुलाला पाहायचा/भेटायचा प्रयत्न केला नसेल तर त्याचा अर्थ परागला मुलाविषयी काहीही वाटत नाही असा होतो. अशा परिस्थितीत परागनी दत्तक द्यायला परवानगी द्यावी. पण घटस्फोटाच्या डिक्रीत मुलाच्या ताब्याविषयी काही तरतूद असेल तर तीही पाहावी. काहीही झालं तरी परागवर सक्ती करता येणार नाही.