"बॅटमिंटनची फुलं परवडत नाही म्हणून... "

ह्या वाक्याला अगदी १०० मार्क ! आम्हालाही परवडायची नाहीतं.... अगदी शेवटचं पिस राहीलेलं असेपर्यंत ते फुल ताबडायचो..मग कोणी २ रुपये कोणी ३ असे करत १०/- १५/- रुपये जमले की नवीन फुलं आणायचं, पण त्या गडबडीत "ती वेळ" निघून जायची आणि अंधार पडून लवकर खेळ थांबायचा...

मी आज सुद्धा गल्लीतल्या पोराटोरांसोबत ते जमले की बॅडमिंटन खेळतो... माझ्या त्या माळ्यावरच्या रॅकेटस कमी खेळामुळे अजून टिकून आहेत...पण हो आता नवीन फुलं आणायची जबाबदारी... एक अख्खा बॉक्स आणून ठेवून मी स्वतःहून पार पाडतो.. !! शेवटची दोन फुलं राहीली की नवीन बॉक्स.....! पोरं पण खुष.. आणि आपण डबल खुष !!

पु.ले.शु.

आशुतोश दीक्षित.