पाषाणभेद यांनी जे मांडले आहे...... ते आदिश्रीच्या वकीलांना मांडता का आले नाही ही खरी मेख आहे.

१०) >>>> आदिश्रीला पुन्हा शाळेत घेण्याचा अंतरिम आदेश दिला जाणार असेल तर आम्ही शाळेत न जाण्याची, शाळेशी कोणताही पत्रव्यवहार न करण्याची किंवा शाळेसंबंधी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे कसलीही तक्रार न करण्याची लेखी हमी देण्याची तयारीही आदिश्रीच्या पालकांनी एका टप्प्याला दर्शविली होती.

ही तयारी आदिश्रीच्या पालकांनी का दर्शवली?... रितसर लढत असणाऱ्या ...... १२ खटले चालवत असणाऱ्या आदिश्रीच्या पालकांनी नमती भूमिका घ्यायचे कारण काय?

मनसे कार्यकर्त्यांमुळे पालक धास्तावले आहेत... हे कोर्टाने कसे मान्य केले? कुणातरी पालकाची प्रतिक्रिया/साक्ष घेण्यात आलीये का?

बऱ्याच गोष्टी संदिग्ध आहेत... त्यामुळे लगेच मत बनवीता येत नाही... पण जे मांडले आहे त्यावरून शाळा व्यवस्थापन खलनायक बनले आहे हे निश्चित.

डो.कैलास