मला या विषयी लिहिते करण्याचे श्रेय क्षीरसागर साहेबांचे आहे. मुख्य हेतू मला आवडलेल्या ध्वनिचित्रफिती मनोगतीना ऐकवणे असा आहे. माझे सांगितिक ज्ञान जुजबी स्वरूपाचेच म्हणता येईल, पण संगीताची मनापासून आवड आणि त्यानी केलेली दिलखुलास फर्माइश या भांडवलावर चार शब्द लिहीण्याचे धारिष्ट्य केले आहे.
या प्रांतात असणारे श्रेष्ठत्वाचे वाद, अतिरेकी व्यक्तीपूजा, क्लिष्ट आणि बोजड तांत्रिक भाग टाळून थोडेफार भाष्य केलेले आहे.
- हरिभक्त