ग्रब उडण्याचं मुख्य कारण म्हणजे एम बी आर (मास्टर बुट रेकॉर्ड ) पुसल्या जाणं. याची अनेक कारणं आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे स्वतः विंडोज ( कृपया खिडकी म्हणू नका. विंडोज हे नाव आहे. ) आधी आपला हक्क मास्टर बुट रेकॉर्डवर सांगतो. त्यामुळं दोन ओ. एस. टाकायची असतील तर आधी विंडोज टाका.
पण काही कारणामुळं ( उदा. व्हायरस किंवा ऍन्टिव्हायरस ) ग्रब उडालाच तर लिनक्स मुळापासून टाकायची गरज नाही. फक्त हे करा.
लिनक्स तबकडी वापरून संगणक तबकडीतून बूट करा.
पुढे लिनक्स मुळापासून टाकण्याऐवजी अपग्रेडचा पर्याय निवडा.
पुढच्या पानावर ग्रब अपडेटचा पर्याय निवडा. दोन ते तीन मिनीटात ग्रब लोड होतो.
त्यापुढच्या पानावर ही सगळी प्रक्रिया संपवून तबकडी काढा आणी संगणक मूळ पद्धतीने सुरू करा.
आता तुमचा ग्रब पूर्वीसारखा व्यवस्थित असेल.
टीप : अस्मादिक जरी फेडोरा वापरत असला तरी वरील पद्धत दोन्हीमध्ये जवळपास सारखी आहे.)