विरंगुळा येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या सायकलबद्दल एवढ्या लोकांची एवढी मतं असतील असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. माझ्या आजुबाजूच्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा पार दृष्टीकोनच एवढ्या एका खरेदीमुळे बदलून गेला. काही तुरळक अपवाद वगळता बहुतेकांच्या नजरेतून माझी 'इज्जत' पार 'डाउन' झाली. सुरुवात झाली ती रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडून. रोज मला बघून अपंग असल्याचा आव आणणाऱ्या आणि गयावया करणाऱ्या भिकाऱ्याने त्या दिवशी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. सुरुवातीला बरं वाटलं. म्हटलं चला, सुंठेवाचून खोकला गेला. पण थोडा 'लॉंगटर्म' विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्याला भाव देणारा एकमेव घटकही ...
पुढे वाचा. : सायकल