अमर्याद लोकसंख्यावाढीमुळे, अनिर्बंध भांडवलशाहीमुळे आणि आपापसातल्या पोकळ प्रतिष्ठेच्या चढाओढीमुळे सगळे लोक पूर्णवेळ निव्वळ उपभोक्ते झालेले आहेत. सगळीकडे विकणाऱ्यापेक्षा विकत घेणाऱ्यालाच जास्त गरज आहे असेच चित्र दिसते. त्यामुळे हे होणे अटळ आहे.
राहिली गोष्ट भांडणाची, त्या मुलीच्या पालकांनी खासगी शाळेच्या शुल्कवाढीविरुद्ध लढण्यात शक्ती खर्च करण्याऐवजी सरकारी शाळांच्या वाईट अवस्थेविरुद्ध लढा दिला तर त्यांनी भरलेला शिक्षणकर सार्थकी लागेलच शिवाय कितीतरी कमी पैशांत त्यांच्या आणि इतरांच्या मुलांना शिकता येईल. ठराविक ठिकाणीच स्वतःच्या हक्कांबद्दल जागृती दाखवणाऱ्या लोकांना भांडखोर म्हणणे फारसे चुकीचे नाही असे मला वाटते.
(न्याय्य न्याय म्हणजे काय? अन्याय्य न्याय असू शकतो काय?)