अतिशय आवडला.
एखाद्या विषयाने झपाटलेले लोक तो विषय समजून घेण्यासाठी जेवढे कष्ट घेतात तेवढेच कष्ट इतराना समजावून देतानाही घेतात असे दिसते. आईनस्टाईनने म्हटलेच आहे , "एखादी गोष्ट तुम्हाला सहा वर्षांच्या मुलाला समजावता आली नाही तर ती मुळात तुम्हालाच समजली नसण्याची दाट शक्यता आहे. "
जगातले सर्वच थोर थोर साहित्यिक, विद्वान, संशोधक आणि शास्त्रज्ञ आपापले विचार हसत खेळत शिकवताना आढळतात. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलेच फक्त विद्वत्तेचा एक बोजड आव मिरवत फिरत असतात.