पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर आणणे आणि रस्त्यांचे हायजीन बिघडवणे हा कुत्र्यांचे मालक निर्लज्जपणे त्यांचा हक्क समजतात. तुम्ही पुढाकार घ्या आणि तुमच्या भागातल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रिय विभागात लेखी तक्रार करा (फक्त तुमची एक सही चालेल). त्या साठी कुत्र्याच्या मालकाचं नांव आणि पत्ता विचारून घ्या. मग त्या अर्जाचा रितसर पाठपुरावा करा, दोन ते तीन दिवसात हा त्रास थांबतो कारण रस्त्याचं आरोग्य बिघडवणं हा गुन्हा आहे.
आमच्या भागातल्या एका अत्यंत बलदंड माणसानी मला (या संदर्भात) 'तुम्ही काय करायचं ते करा' म्हंटल्यावर मी त्याला साधारण दोन-तीन तास पोलिस स्टेशनमध्ये नुसता बसवून ठेवला होता. आमच्या भागातल्या सगळ्यांच्या सह्या घेऊन मी पोलिस तक्रार केली होती तेंव्हा त्या इंस्पेक्टरनी त्याला 'तुम्ही कुत्री पाळा नाही तर हत्ती पण लोकांना त्रास होता कामा नये' असा दिलखुलास दम दिला होता. तेंव्हा पासून कुत्राही नाही आणि तो मला बघितल्यावर असा काही लाजतो की विचारायची सोय नाही.
संजय