".....आपण आपल्याच निर्माण केलेल्या फुग्यात राहात असताना बाहेर एक नैसर्गिक जग अजूनही आहे. आपण ठरवलं तर सगळं कृत्रिम जग नष्ट करून पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन एक शांत, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतो.
निर्णय आपल्या हाती आहे. पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा असा टाहो फोडत वरवरची मलमपट्टी करत एक दिवस भीषण आयुष्याला सामोरं जायचं की वेळीच शहाणं होऊन मार्ग बदलायचा आणि स्वतःला वाचवायचं?"

निरंजन हा रितेपणा म्हणजे 'वेळेची उपलब्धता' आहे. तुम्ही ती कशी वापरता यावर तुमच्या जीवनाची रंगत अवलंबून आहे.

विधायक संशोधन नेहेमी निर्वैयक्तीक आणि जीवन सोपं आणि सहज करणारं असतं. त्याचे दोनच उद्देश असतात : एक- शारिरीक हालचाली पासून मुक्तता आणि दोन-वेळेची बचत. संशोधनाचा योग्य उपयोग तुम्हाला वेळ आणि शारिरीक उर्जा उपलब्ध करून देतो. लोकांना पैसा मिळवणे हा बहुदा एकच पुरुषार्थ वाटत असल्यामुळे खेळ, छंद, विहार, निर्मिती, विश्रांती, हितगूज या पर्यायांचा विचार माणूस करत नाही. पैसा मिळवण्याच्या खटपटीत अधिक (आणि न लागणारं) उप्तादन, मग ते विकण्यासाठी परत मनुष्यबळ, आणि त्यातून परत न आवरता येणारा कार्यभार अशी साखळी तयार होते.

जगाचं आपल्याला काही फारसं करता येत नाही कारण प्रत्येकाची आकलन क्षमता भिन्न असते पण आपल्याला लाभलेल्या स्वास्थ्याला रितेपण न म्हणता संधी म्हणून तिचा उपयोग करणं, (वयाचा विचार न करता) नवीन गोष्टी शिकणं (समजा साहित्य निर्मीती, खेळ, संगीत), जे आवडतं त्याचा पाठपुरावा करणं (समजा पाककला, विनोदी साहित्य, चित्रपट, नाटकं), जे जे काही उत्तम आहे ((समजा चित्रकला, नृत्य, तुमचा व्यवसाय, तुमचं आवडतं काम) त्यात रस घेणं यानी तुम्ही एकएक दिवस बेसुमार रंगवू शकता.

पाश्चिमात्य देशातलं रितेपण हे मुख्यतः  पती-पत्नीच्या विस्कटलेल्या संवादामुळे आहे, त्याचा परिणाम म्हणून कुटुंब व्यवस्था संपली आहे आणि कशात काही अर्थ वाटत नाही असं झालं आहे. पती-पत्नीतला संवाद जगण्याची लज्जत कमालीची वाढवतो, आपल्याकडे अजून ती संधी आहे.

संजय