प्रशासन तुमची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे माफी मागण्याचा/करण्याचा मुद्दा नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.
मी जेव्हा आपल्याच सुविधेचा वापर करून टाईप करत होते तेव्हा सर्व बरोबर
दिसत होते
मनोगताच्या लेखन/संपादन सुविधेत मराठी लिहिताना त्या शब्दांची इंग्रजी स्पेलिंगे करून लिहावयाची पद्धत आहे हे तुम्हाला माहिती असेल.
उदा.
माहिती
हा शब्द लिहायचा असेल तर
maahitee असे तुम्ही लिहीत गेलात की तो देवनागरीत माहिती असा उमटेल. ह्यातील हि वरील ऱ्हस्व वेलांटी ह च्या आधी येण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही/ करू नये.
मनोगताची ही सुविधा आय ई आणि फायरफॉक्स ह्या दोन्ही न्याहाळकांत (विंडोज किंवा लायनक्स दोन्ही व्यवस्थांमध्ये) एकाच प्रकारे चालायला हवी. तसे होत नसल्यास कृपया त्याची माहिती द्यावी.