त्रिताल - पेशकार

उ. झाकिर हुसेन आणि योगेश समसी यानि वाजवलेला हा तीनतालातील 'पेशकार' आहे. एकल तबलावादनाची सुरुवात बहुधा पेशकार ने होते. 'धी कड धींधा धा धींधा धाती धाती धा धा धिंधा' या सारख्या ठराविक बोलाभोवती पेशकार ची गुंफण केली जाते. मैफिलीत पुढे जे कायदे पेश करायचे असतात, त्यांच्या बोलांची झलक पेशकार मध्ये दाखवता येते. पक्का खवय्या जशी स्वयंपाकघरातून दरवळणार्या सुवासावरूनच 'दम की बिर्याणी', 'छोले' अशा डिश ला पहिली दाद देतो, तशीच जाणकार श्रोते पेशकार ऐकून देतात. पेशकार चा इतका विचारपूर्वक, वैविध्यपूर्ण विस्तार माझ्या ऐकण्यात तरी उ. झाकिर हुसेनच करतात.

(या दुवा पाठवल्याबद्दल चैतन्यला धन्यवाद)