यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:
वाजेद अली शाहच्या जमान्यत असं घडलं. हा वाजेद अली लखनौचा राजा होता. ठार बेवडा, पण संगीत, चित्रकला, सौंदर्य यांचा प्रेमी. सर्व प्रकारचे नर्तक, संगीतकार, कवी यांना तो त्याच्या दरबारात बोलवी. एक संगीतकार नेहमीच त्याच्या दरबारात यायला नकार देत होता. खुद्द वाजेद अलीच त्याच्याकडे गेला - हा दुर्मिळ योग होता, कारण वाजेद अली कधीच कुणाकडे गेला नव्हता. त्याचं आमंत्रणच पुरेसं असे आणि मागाल तेवढी किंवा जास्तीत जास्त बिदागी तो देत असे. पण तरीही संगीतकार यायला तयार नव्हता. वाजेद अली त्याच्याकडे आल्यावर संगीतकार म्हणाला, "मी येईन जरूर, पण तुम्ही माझी एक अट ...