शेखर म्हणाले त्याला सहमत.
माझ्या आजीकडे अजूनही मांजरी आहेत, आमच्याही घरी असतात कधी कधी... म्हणजे येऊन जाऊन .... आईला हौस नाही पण अती लाडही करत नाही. बहुदा तिच्या लहानपणी बऱ्याच मांजरी बघितल्या, म्हणूनही असावे.
एक गंमत :- इथे दक्षिण कोरियात कुत्रे मांजरांना भितात. मुळातच इथले कुत्रे भित्रे असावे, कारण कुत्रा हा इथला महागडा खाद्यपदार्थ आहे, मात्र मांजर नाही, त्यामुळेच त्यांचा अधिक जोर चालत असावा