शेवटी तिन्ही नायक वेष बदलून (!) खलनायकांच्या अड्ड्यावर जाऊन शीर्षकगीत म्हणतात ज्यात सदर त्रिकूट आपली नावे पुन्हा पुन्हा सांगते. समस्त खलनायकांना ह्या त्रिकुटाची नावे माहिती असतात. तरीही पूर्ण गाणे ऐकताना त्यांना हेच ते लोक अशी पुसट शंकाही त्यांना येत नाही.
आता ह्याचे श्रेय त्यांच्या बिनडोकपणाला द्यायचे का वेषांतर बेमालूम होते असे मानायचे? असो.