प्रतिक्रियांबद्दल आभार मंडळी.

खरं तर परमेश्वरसाहेबांच्या कचेरीतील आणखी काही गोंधळांबद्दल लिहायचं होतं ,पण वेळ आणि लिखाणचिकाटी दोन्ही कमी पडल्यामुळे आवरतं घेतलं. (त्यामुळे सवाई माधवराव, भाग २ येणार नाही.). राधिका(आणि काही ज्येष्ठ मंडळी), मला अहो जाहो केलं नाही तरी चालेल.. माझ्या मनोगतावरील इतर मैत्रिणींसारखं अगं तुगं च कर.

जेव्हा कळण्याइतकी मोठी झाले, तेव्हापासून पाया पडल्यावर बाबा आशिर्वाद देतात, 'तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.' शंकाखोर मी अजूनही विचारते, 'सर्व? आणि माझ्या काही इच्छा माझ्या निकटवर्तीयांच्या इच्छांच्या परस्परविरोधी असतील तर?' मग बाबा पुढे पुरवणी जोडतात, 'तुझ्या सर्व 'रॅशनल' इच्छा पूर्ण होवोत असं मला म्हणायचं आहे.' थोडक्यात म्हणजे डोके ताळ्यावर ठेवून इच्छा कर. कोणाचं वाईट चिंतू नकोस, अवास्तव मोठ्या इच्छा प्रयत्नांची जोड असल्याशिवाय करु नकोस. असंच काहीसं आपण देवाला घालत असलेल्या साकड्यांबद्दल असेल का? देवाच्या दरबारी नक्की कसं काम चालत असेल? सुख दुःखाचा प्रत्येकाचा जमाखर्च समान राखणं किती कठीण काम आहे? 'भगवान के घर देर है पर अंधेर नही' मधला देर नक्की किती आहे? 'होतं ते सगळं चांगल्यासाठी' मधल्या 'चांगल्या' च्या व्याख्या कोणी ठरवायच्या? 'यापेक्षा वाईट होऊ शकतं' म्हणून वाईटालाच चांगलं मानयचं का? वाईटाच्या व्याख्या तरी काय मुळात? हे सर्व व्यवस्थापन देव चालवतो तरी कसे? असे अनेक (पकाऊ) प्रश्न मनात येतात आणि त्यातूनच जन्मला आहे 'परमेश्वर साहेबांची कचेरी'. तो आपण नेहमीप्रमाणे गोड मानून घेतल्याबद्दल मनापासून आभार.
(किर्तनकार)अनु