मस्तच नरेशवा. अंडी हा प्रकार च असा आहे की जेवढी कल्पकता वापरून करू तेवढी मजा येते खाताना व करतानाही झटपट होते आणि रुचकर लागते.
१) अंडी हाफ फ्राय करताना घरचे ताजे पांढरे लोणी वापरले की चव फार छान लागते.
तव्यावर लोणी टाकायचे अंडे सरळ तव्यावरच फोडायचे. पिवळा बलक आखा तसाच ठेवायचा. वरून मीठ आणि मिरपुड भुरभुरायची आणि फक्त ३० ते ४० सेकंदच झाकून मंद जाळावर शिजवायचे. ज्यांना हाफ फ्राय आवडत नाही त्यांनी १ मिनिट भर शिजवायचे.
२) अजून एक प्रकारः अंडी मिठ तिखट घालून फेटा ब्रेड त्यात दोन्ही बाजुंनी बुड्वून शॅलो फ्राय करा.