माधवराव, छाया, मयुरेश, विनायक, प्रोत्साहनपर प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

माधवराव, तुमचे विशेष आभार, एवढी चांगली प्रतिक्रिया दिल्याबद्दल! :-)
छाया, तू म्हणतेस तसं विजेच्या लोळामुळे निर्माण होणारा लखलखाट हे रंगवायला खरोखर आव्हानात्मक वाटत होतं... खरंतर तसा परिणाम साधता येतो का हे आजमावण्यासाठी प्रयोग करणं हाच या चित्रामागचा हेतू होता. वीज कडाडल्यावर त्या रेषेच्या अवतीभवतीचा भाग उजळून निघतो, त्यात मागच्या वाऱ्यामुळे फिस्कारलेल्या ढगांच्या कडा नकळत डोकावून जातात आणि विजेच्या रेषेपासून काही अंतरावर हा प्रकाश विरतो. हा जबरदस्त आणि देखणा परिणाम साधायला कुठलं माध्यम वापरावं असा प्रश्न होता. लखलखाटाचा हळूहळू विरत जाणारा उजेड पारदर्शक रंगलेपनानं साधता येई असं वाटलं. पण ती पारदर्शकता साधण्यासाठी जलरंग (जे साधारणतः इतर प्रकारच्या रंगांपेक्षा पारदर्शक थर देऊ शकतात) वापरणे हा एक पर्याय होता. पण त्या माध्यमात उजेडाचा भाग अंधारात डिफ्यूज (मराठी प्रतिशब्द?) करणं अवघड ठरेल असं वाटलं. म्हणून तैलरंगातच चित्र करावं असं ठरवलं. चित्रातल्या उजळलेल्या भागासाठी कापसाचा बोळा टर्पेंटाइन तेलात भिजवून त्यावर किंचित जांभळट रंग घेऊन त्याचा हलकासा पारदर्शक थर दिला. मग अंधाराचा भाग रंगवून उजेड आणि अंधार यांच्या कडा जिथं डिफ्यूज होतात तिथं रंग कोरडा पडलेल्या ब्रशनं छोटे धब्बे देऊन हवा तो परिणाम साधला. आणि सर्वात शेवटी विजेच्या शाखा रंगवल्या.