मुलें अशा शाळेंत माफ करा शिक्षणाच्या दुकानांत पाठवणें प्रतिष्ठेचें वाटतें. आदिश्रीचे पालक आणि मनसे, दोन पक्षी शाळेनें आणि न्यायालयानें एकाच दगडात मारले आहेत. शाळा आदिश्रीच्या घरापासून किती अंतरावर आहे आणि शाळेतील अध्यापनाचा दर्जा काय हें एकाही बातमींत नाहीं. ब्रेकिंग न्यूज मिळाली, बस्स, काम झालें. मग आदिश्रीचें वा शाळेचें वाटोळे झालें तरी चालेल. माध्यमांना वा न्यायालयाला त्याचें कांहींही देणेंघेणें नाहीं.
आदिश्रीची सुटकाच झाली म्हणायची अशा शाळेतून.
सुधीर कांदळकर