'अमृताची वारी | सार्थ होय ||'
- गेल्या रविवारच्या (अकरा तारखेच्या) दै. सकाळने पुरवणी छान काढली होती. उत्तम कांबळे यांच्या कांही छान कविता, तसेच डॉ. रॉय पाटणकर यांचा सुंदर लेख तसेच 'वारी-निष्काम कर्म' हा लेख खरोखरच वाचनीय वाटले. वारी शब्दाचा अर्थ पाणी, व- हायड्रोजन, र- ऑक्सिजन, दोन हायड्रोजनचे अणू म्हणून वा आणि एक ऑक्सिजनचा अणू म्हणजे र यांचा शक्ती 'ई'द्वारे संयोग म्हणजे वारी अर्थात् पाणी. अनेक ठिकाणांहून पाण्याचे प्रवाह जसे प्रवास करीत सागरास मिळतात त्याप्रमाणेच कानाकोपऱ्यातून भक्तांच्या दिंड्या भक्तीचा ओलावा घेऊन विठूच्या अंगणी गोळा होतात! तेथे अमृतमय होऊन जातात... अमृताची वारी । सार्थ होय ॥