मी सध्या कोरियातील undergraduate विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा सहायक म्हणून शिकवत आहे. याच प्रकारची शिक्षणपद्धती इथे आहे. (जसे आम्ही ब्रिटिशांचे गुलाम होतो तसे हे अमेरिकनांचे गुलाम आहेत).

एक गोष्ट या प्रणालीतली मला चांगली वाटली की मुलांना शिक्षणाव्यतिरिक्त अनेक क्लब्ज, खेळ व समाजसेवा, यासाठी वेळ देता येतो तर दुसरीकडे सतत कोणत्या ना कोणत्या परीक्षा (साधारणपणे ८ आठवड्यांनंतर) असतात, त्यामुळे (किमान विद्यापिठात) प्राध्यापक एक भाग / धडा परीक्षेसाठी निवडतात किंवा २०-३० प्रश्न देतात. तरिही विद्यार्थी गंभिरतेने उत्तरे लिहित नाही  

बरेचदा या विद्यार्थ्यांचे मुलभुत (बेसिक) ज्ञान कमी असते. कारण अधिक खोलात जाउन अभ्यास करण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि सगळं काही स्वतःचं स्वतःच करावं लागतं. प्रत्येक गोष्टीसाठी जाडजुड (प्राध्यापकाने सांगितलेलं) पुस्तक वाचावं लागतं.

त्यामुळे, ट्युशन सोडल्या तर भारतातला वार्षिक अभ्यासक्रम मला अधिक चांगला वाटतो. (वर्षभर सुहास शिरवळकर वाचता येतात  ). फक्त ट्युशन्सवर बंदी हवी.

अवांतर :-एस ए टी करिता कोचिंग असतं का हो ?