माझ्यासारखी अनेक मार्जारप्रेमी मंडळी आहेत हे पाहून खूप बरे वाटले. खरे आहे.. जॉन अगदी निराळाच होता. त्याने कधी चुकूनही 'दुधात तोंड घाल वा चोरी कर' असे प्रकार केले नाहीत. त्याच्या आईला नंतर चार मुलगे झाले .(twister, master, poster ,Alister..!). त्यांचेही जॉनने खूप लाड केले...त्याच्या काही सवयी - माझ्या आईने हातात धरलेली पोळी अचूक झेप घेऊन पकडणे , घरातील माणसांच्या नाकाला नाक लावून गोड पापा देणे - या खरच युनिक होत्या.. तो कायम 'हे घर माझे आहे, माझी भावंडे माझी जबाबदारी आहे' अशाच अविर्भावात जगला..!