क्या बात है! बऱ्यांच दिवसांनी तुझी (अविडंबित - असा शब्द आहे की नाही माहिती नाही) गझल वाचून छान वाटलं. गझल सुंदर आहे.
'समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी' - अप्रतिम.
मौनाची भाषा/धडपड हा शेरही आवडला. महेशशीही सहमत.
गझलेतल्या काही शेरांत (बहुधा तुलाही अभिप्रेत असलेले) जुने संदर्भ जागे झाले. उदा.
पाऊस / कागदाची नाव - कागज की कश्ती बारिश का पानी
जुन्या वहीच्या पानांवरून -
किताब ए माझी के पन्ने उलट के देख जरा
न जाने कौनसा पन्ना मुडा हुवा निकले!