इंग्लंडमध्ये आता एकदा निवडणुका झाल्या की ५ वर्षासाठी तीच संसद राहावी अशी घटना दुरुस्ती करण्याचं घाटतंय. सरकार अल्पमतात गेलं तरीही पुनः संसदेनंच दुसरं सरकार निवडावं असा विचार आहे. खर्च / त्रास पाहता हा विचार आवडला. अर्थात, राजकारणी यातूनही (त्यांच्या हिताचा) मार्ग काढतीलच.