एकतर मी या लेखाचं नांव 'सहल' ऐवजी 'वारी' दिलं असतं तर तुम्हाला कदाचीत ते समजलं असतं.

मी ओशोंच्या समाधी वरचं वाक्य तुमच्या जीवनात कसा सहलीचा मूड आणू शकेल हे लिहालं आहे कारण तो मूड हा माझा वैयक्तीक अनुभव आहे.

तुम्ही ओशोंच्या विरोधात आहात आणि त्यांच्या विषयी मी काही लिहीलं की एकदम सुसाट सुटता. इथे मी आणि माझे वाचक यात संवाद चालू आहे. मी काही ओशोंच्या जीवनाची जवाबदारी घेतलेली नाही. दुसरं मी पनवेलच्या बार मधल्या लोकांना हे सांगत नाही मनोगतच्या वाचकांसाठी (आणि खरं तर स्वतःसाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी लिहीतो).

मला एक कळत नाही तुम्हाला पनवेलच्या बार मध्ये मजा करणाऱ्यांच्या कुटुंबियांची आणि सियाचीनमध्ये लढणाऱ्यांचा जवानांची काळजी असेल तर तुम्ही इथे काय करताय? किमान बुद्धी असलेला माणूस सुद्धा हे जाणू शकेल की इथे अशा प्रतिक्रिया लिहून काही उपयोग नाही.  

तुम्ही खरंच ओशो विरोधी असाल आणि त्यांनी केलेल्या नुकसानाची तुम्हाला काळजी असेल तर (इथे कलमबहाद्दुरी करण्यापेक्षा आणि माझं लिखाण त्याला जोडण्यापेक्षा) ते तुमच्या बुद्धीमत्तेनी (किंवा भक्तीरसानी) सुधारण्याचा प्रयत्न केलात तर जास्त विधायक होईल.

संजय