एकदम कबूल, ऊन-पाउस चालू झाले की माझ्या 'हो' लेखातली "फक्त कपडे वाळावे म्हणून कॉफी शॉप मध्ये तास-दिडतास गप्पा मारण्याची आठवण.." मला आवर्जून येते.. आणि पुन्हा कॉलेज लाईफ मध्ये परत गेल्याची भावना होते  !

काही पराभवाचे अन नामुष्कीचे क्षण असेच पानोपानी ठिबकणाऱ्या पर्जन्यजलासारखे, शेवाळाला धरून ओघळणारे, झडीच्या सरींसारखे नकोनकोसे वाटणारे, -- हे अगदीच गडगडाटी न राक्षसी पावसात जर तुम्ही एकटेच असाल तर -- ह्यावरून पराभवावासंबंधीचा एक जुना उतारा आठवला;

==> आयुष्याचा एक टप्पा सुरू झाला. लहानपण मागे पडत चाललं.
आकडेमोड, हिशोब, गुणाकार, भागाकार, या सगळ्यात भावना बुजल्या आणि..
न जमणाऱ्या व्यवहाराची तोंडओळळख इथे सुरू झाली.
अपयशी मुलगा ही माझी पहिली ओळख........<===

पु ले शु.

आशुतोष दीक्षित.