वाईट नाहीं. शाळेंत असतांना मला आणि माझ्या एका मित्राला शेंगदाणे खायचें व्यसन लागलें होतें. आम्हीं रोज संध्याकाळीं दहा दहा पैशांचे शेंगदाणे खात असूं. अर्थात घरून खरें सांगून पैसे मागून. एस एस सी लागेल्यावर अभ्यासाच्या दबावांत तें कधीं सुटलें कळलें नाहीं. वाचनाचें आणि संगीताचें मात्र अजून सुटलें नाहीं. नुकसान सोडा, खरें तर फायदाच झाला. माय मोडून चार महिने घरांत बसल्यावर हाच विरंगुळा. सेवानिवृत्त झाल्यावरही या व्यसनांना चोवीस तास पुरत नाहींत.
सुधीर कांदळकर