प्रदीप कुलकर्णी साहेब, आपली ही मालिका मी पहिल्या भागापासून अगत्याने वाचतो आहे. ही लेखमालिका लिहिण्यासाठी आपण घेत असलेले कष्ट ती वाचताना दिसून येतात. नजरेआड झालेल्या या कवींवर लेख लिहून त्यांना तुम्ही आदरांजली तर वाहिली आहेच, पण त्यांची ओळख आम्हाला करून देण्याचे महत्वाचे कामही आपण केले आहे. हे लेखक निवडणे, त्यांची माहिती संकलित करणे, त्यांच्या कविता गोळा करणे हे एक मोठे अवघड काम आहे. हे लेख लिहून आपण मराठी साहित्यक्षेत्राची मोठीच सेवा करत आहात यात काय शंका!
या लेखमालिकेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद नि पुढील लेखांसाठी शुभेच्छा!
अभि.